आमच्याबद्दल काही शब्द

सर्व गणेश भक्तांना सप्रेम जय गणेश
अखंड घाटकोपर मधील तिसरा मानाचा आणि घाटकोपर (पश्चिम) मधील पहिला मानाचा गणपती म्हणजेच तुम्हा-आम्हा सर्वांचाच "पारशिवाडीचा राजा'

पारशिवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना सन १९५३ साली झाली आहे. अतिशय साध्या पद्धतीत गणेशोत्सवाची सुरुवात झाली. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल त्यावेळची वर्गणी कमीत कमी 24 पैसे पासून सुरुवात झालेला हा गणेशोत्सव आज पूर्ण पारशिवाडीमध्येच मर्यादित न राहता अखंड मुंबईत प्रसिद्ध झाला आहे तो मंडळाचे संस्थापक "कै. महादेव भिकाजी सातपुते" या नावामुळेच त्या काळात स्वतःची पदरमोड करत मिळेल ती वर्गणी जमा करत हा उत्सव सर्वप्रथम पारशिवाडी मध्ये नव्हे तर घाटकोपर (पश्चिम) मध्ये सुरुवात केली.

कै. महादेव शेठ यांचा गणेशोत्सव म्हणून, त्यावेळी त्यांना साथ लाभली होती.ती त्यांच्या वयाचे सहकारी, प्रभाकर उभारे, डी. जी. सावंत, त्यांचे बंधू मनोहर तसेच दत्तात्रेय सातपुते याचे सहकारी, विलास शेलार, मधुकर, ऋविकांत, प्रकाश, नरेश, असे अनेक सहकारी हा उत्सव त्या काळात साजरे करत असताना मंडळाचे संस्थापक कै. महादेवशेठ भिकाजी सातपुते" यांचे आकस्मित निधन झाले आणि पुढे हा सुरु झालेला गणेशोत्सव कसा साजरा होणार विभागातील लोकांपुढे प्रश्न असताना मंडळाचे संस्थापक सदस्य "श्री डी.जी. सावेल, ही.व्ही. गाडे, रघुनाथ साटम, संत कोर्टेकर! सहदेव पवार, वामन केजी, शिवनारायण पांडे, पी. आर. सावंत तारासिंग चौहान अशी अनेक आमची वडीलधारी मंडळी यांनी पुढाकार घेऊन हा उत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आणि पुढे आम्हा तरुण मंडळीना आमच्या व वाडवडीलांच्या हया निर्णयाला पाठिबा देत सर्व तरुण मंडळी या उत्सवाला 4 सहभागी झाली.

पुढे हा गणेशोत्सव साजरा करीत असताना मंडळास योग्य दिशा दिली पाहिजे या अनुषंगाने मंडळाची धर्मादाय आयुक्तांकडे रितसर नोंदणी १९८५ साली करण्यात आली आणि मंडळाचे नाव निश्चित झाले ते म्हणजे " पारशिवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ".


उपक्रम

फोटो गॅलरी

व्हिडिओ गॅलरी

Loading

संपर्क साधा

    पत्ता

    ७/७, हयात मोहम्मद चाळ,
    हयात मोहम्मद बिल्डिंग जवळ,
    पारशिवाडी, घाटकोपर पश्चिम, मुंबई - ४०००८६ .




    ईमेल

    info@parshiwadicharaja.com